ही अमानुष दडपशाही का?
बनारस हिंदू विद्यापीठात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या छेडछाडी व वस्तीगृह परिसरात काही मुलांचे होणारे अश्लील चाळे या विरोधात मुलींची निदर्शने चालू होती. त्यांची मागणी एवढीच होती की, vice chancellor गिरीश चंद्र त्रिपाठी यांनी स्वतः येऊन सुरक्षिततेची हमी द्यावी. पण असे न होता गेट जवळ शांतपणे निदर्शने करणार्या मुलींवर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. 21 सप्टेंबर च्या संध्याकाळी झालेल्या छेडछाडीत पिडीत मुलींनी विद्यापीठ प्रशासनाला तक्रार केली पण मुलींनी असा आरोप केला की,त्यांना विद्यापीठ प्रशासनाने इतक्या उशीरापर्यंत बाहेर का फिरता? बलात्कार होण्याची वाट पाहताय का? असे उलट प्रश्न विचारले. त्यामुळे विद्यार्थीनिंनी धरणे व निदर्शने केली. या मुलींनी सुरक्षा मागुन काही गुन्हा केला का? "बेटी पढाओ , बेटी बचाओ " हा नारा देणारे आपण भारतीय. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे सर्वत्रच हा नारा दिला जातो मग हा नारा तेवढ्यापुरताच का?. दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षिततेची भावना समाजमनावर असंतोष बिंबवणारी आहे. " बहुत हुआ नारी पर वार अबकी बार ...