ही अमानुष दडपशाही का?
बनारस हिंदू विद्यापीठात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या छेडछाडी व वस्तीगृह परिसरात काही मुलांचे होणारे अश्लील चाळे या विरोधात मुलींची निदर्शने चालू होती. त्यांची मागणी एवढीच होती की, vice chancellor गिरीश चंद्र त्रिपाठी यांनी स्वतः येऊन सुरक्षिततेची
हमी द्यावी. पण असे न होता गेट जवळ शांतपणे निदर्शने करणार्या मुलींवर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. 21 सप्टेंबर च्या संध्याकाळी झालेल्या छेडछाडीत पिडीत मुलींनी विद्यापीठ प्रशासनाला तक्रार केली पण मुलींनी असा आरोप केला की,त्यांना विद्यापीठ प्रशासनाने
इतक्या उशीरापर्यंत बाहेर का फिरता? बलात्कार होण्याची वाट पाहताय का? असे उलट प्रश्न विचारले. त्यामुळे विद्यार्थीनिंनी धरणे व निदर्शने केली.
या मुलींनी सुरक्षा मागुन काही गुन्हा केला का? "बेटी पढाओ , बेटी बचाओ " हा नारा देणारे आपण भारतीय. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे सर्वत्रच हा नारा दिला जातो मग हा नारा तेवढ्यापुरताच का?.
दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षिततेची भावना समाजमनावर असंतोष बिंबवणारी आहे. " बहुत हुआ नारी पर वार अबकी बार मोदी सरकार " हे घोषवाक्य फक्त निवडणूकीपुरतच होत का?.
उत्तरप्रदेशात पण भाजपचच शासन आहे. सरकार कुठलही असो पण अशाप्रकारे दडपशाहीचा वापर करून आवाज बंद करणे उचित ठरते का?. प्रश्न इथेच मिटत नाहीत तर विद्यापीठात वस्तीगृह परिसरात cctv cameras नाहीत, तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही ही गंभीर बाब आहे. आपला हक्क मागण्यार्या मुलींवर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात येतो ही दुर्दैवी घटना आहे.
वैभव दर्शनराव देसाई.
लेखक.
7028600378
हमी द्यावी. पण असे न होता गेट जवळ शांतपणे निदर्शने करणार्या मुलींवर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. 21 सप्टेंबर च्या संध्याकाळी झालेल्या छेडछाडीत पिडीत मुलींनी विद्यापीठ प्रशासनाला तक्रार केली पण मुलींनी असा आरोप केला की,त्यांना विद्यापीठ प्रशासनाने
इतक्या उशीरापर्यंत बाहेर का फिरता? बलात्कार होण्याची वाट पाहताय का? असे उलट प्रश्न विचारले. त्यामुळे विद्यार्थीनिंनी धरणे व निदर्शने केली.
या मुलींनी सुरक्षा मागुन काही गुन्हा केला का? "बेटी पढाओ , बेटी बचाओ " हा नारा देणारे आपण भारतीय. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठे सर्वत्रच हा नारा दिला जातो मग हा नारा तेवढ्यापुरताच का?.
उत्तरप्रदेशात पण भाजपचच शासन आहे. सरकार कुठलही असो पण अशाप्रकारे दडपशाहीचा वापर करून आवाज बंद करणे उचित ठरते का?. प्रश्न इथेच मिटत नाहीत तर विद्यापीठात वस्तीगृह परिसरात cctv cameras नाहीत, तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही ही गंभीर बाब आहे. आपला हक्क मागण्यार्या मुलींवर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात येतो ही दुर्दैवी घटना आहे.
वैभव दर्शनराव देसाई.
लेखक.
7028600378
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा