पोस्ट्स

विकासपुरुष शंकरराव

इमेज
महाराष्ट्राच्या व देशाच्या सामाजिक, राजकिय व विकासासंदर्भात ज्यांनी दूरदृष्टी ठेऊन कार्य केलं असे थोडे फारच मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यापैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब. पैठणच्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या शंकररावांचा नांदेडचे नगराध्यक्ष ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास राहिला . घरची हलाकीची परिस्थिती असतानासुद्धा शंकररावांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग नोंदवत युवकांना एकत्रित करण्याकरिता महत्वाची भूमिका निभावली. शंकरराव पुढे उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले,शंकरराव हे हुशार व होतकरू विद्यार्थी होते त्यामुळे त्यांना तेथील महाविद्यालयात scholarship मिळाली व त्या माध्यमातून त्यांनी BA व वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान 1934 साली त्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला, स्वामींच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेबांनी मोठया ताकदीने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला.                            शंकररावांच कर्तृत्व पाहून स्वामी रामानंद तीर्थ यांनी

तरुणाई मध्ये वाढतेय राहुल यांची क्रेझ

इमेज
#Conversation_with_changemakers राहुल गांधी यांची प्रतिमा विरोधी पक्ष व काही प्रमाणात Media ने खूप मालिन केली आहे,त्यांच्यावर खूप प्रमाणात टीका ही होत असते.राहुल गांधीच कधी भाषण ही ऐकलेल नसतं किंवा त्यांच्या विषयी वाचन ही नसतं असे लोक ज्यावेळेस fake videos पाहून राहुल यांना "पप्पू" म्हणून संबोधतात तेंव्हा खूप वाईट वाटत.एवढी टीका होऊन सुद्धा, आयुष्यात अनेक चढ उतार आले असतांना ही व्यक्ती खूप सकारात्मक राहते हे मला प्रचंड भावतं. आज जर सत्ताधाऱ्यांविषयी कुणी लिहिलं किंवा आवाज उठवला तर त्यांना नोटीस पाठवली जाते पण एवढी वैयक्तिक टीका होऊन सुद्धा लोकशाही ला धरून चालणारा हा युवकांचा नेता,माध्यमांसोबत, जनतेसोबत नेहमी संवाद साधत असतो. कितीही अपप्रचार केला तरीही शेवटी वास्तविकता ही जनतेसमोर येत असते. युवकांचा देश असणाऱ्या भारत देशात हा युवक नेहमी युवकांच्या प्रश्नांना तोंड देत असतो, गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मध्ये राहुल यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे.राहुल हजारो युवकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असतात याअगोदर चेन्नई, दिल्ली येथील त्यांचा युवासंवाद खूप गाजला,हे करत

"कनेक्शन टू ऑब्सेशन: भारतातील वाढते इंटरनेट व्यसन"

इमेज
Image credit :  Digital addiction - HelloGrads गेल्या दहा वर्षात digital क्रांती मध्ये झपाट्याने प्रगती झाली ती इतकी की, अन्न,वस्त्र,निवारा या मुलभुत गरजांनंतर नकळत का होईना आपण digital विश्वासाचा समावेश करतो मग यात भ्रमणध्वनी असेल,आंतरजाल असेल वा इतर त्या संबधित साधने म्हणजे यांची आपल्या आजघडीला क्षणाक्षणाला गरज भासते.                            ब्रिटन (England) मध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती संपूर्ण जगभरात पसरली . औद्योगिक क्रांती ची सुरुवात ही वस्त्रोद्योगाचे यंत्र बनवणे,लोखंड बनवण्याचे कौशल्य ते  electronic वस्तू बनवणे असा अनेक दशकांचा प्रवास सुरु झाला .याच पार्श्वभूमीवर 19 व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात इंग्रजी गणित प्राध्यापक चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या संरचनेच्या आधारित इ.स.1937-46 च्या दरम्यान च्या काळात डिजिटल युगात खूप मोठी क्रांती आणणाऱ्या संगणकाची निर्मिती झाली. पण त्या काळातील संगणकाना खूप काही मर्यादा होत्या तसेच त्यांचा आकार खूप मोठा होता पण नंतरच्या काळात त्यात खूप बदप होत गेले व संगणका मध्ये परिवर्तन होऊन आज त्याचे स्वरूप तर आपल्या समोर आहेच.            

हेच का भाजप चे महिला धोरण ?

इमेज
सत्तेत येण्यापूर्वी भाजप ने अनेक आश्वासने जनतेसमोर दिली ,'अच्छे दिन' चा नारा देत 2014 (मे) मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. ज्या अच्छे दिन ची भुरळ घालून मोदी सरकार सत्तेत आलं,  ते अच्छे दिन अस काही नसतंच  असं भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. म्हणजे ज्यामूळ यांना जनतेनी निवडून दिल तेच यांनी `जुमला'म्हणून बाजूला सारल. त्याच बरोबर ` बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा देत, महिला सशक्तीकरणा च्या संबंधित व महिलांच्या विकासाच्या साठी आमचं येणार सरकार कटिबद्ध असेल असं तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अनेक प्रचार सभेत ओरडून ओरडून सांगत होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा यांचं सरकार आलं तेंव्हा याच लोकांचे महिलांविषय चे विचार व धोरण काय होते व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजप कडे अनेक महान विद्वान वाचाळवीर आहेत यात शंकाच नाही. एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या व भाजपा महिला विंग च्या कर्नाटक च्या नेत्या म्हणतात `प्रत्येक गोष्टीत महिला पुरूष समानता असण्याची गरज नाही'. तर इकडे मह

प्रेम-करीअर-मेहनत-जिद्द व सामाजिक सध्यस्थिती वर भाष्य करणारा 'पाटील'

इमेज
सहयाद्री मंथन | पुणे ◆ वैभव देसाई  ________________________________________ सामाजिक सध्यस्थिती व फोपावलेला जातीवाद यावर दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या चित्रपटा मध्ये प्रकाश टाकला आहे... त्याचबरोबर प्रेम- करिअर-जिद्द व मेहनत यावर भाष्य केले आहे. पाटील चित्रपटाचे पोस्टर आजपर्यंत पाटील या घटकाची भूूमिका लिखाणातून, चित्रपटातून बहुतांश वेळा नकारात्मक रेखाटली आहे किंवा तस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण पटकथा लेखक व दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी एक भावनिक,मेहनती, कष्टाळू, इमानदार पाटला च वास्तव दाखवलं आहे. आजघडीला पाटलांची सध्यस्थिती काय आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.. मिजगर यांनी नांदेड शहर व परिसरात असलेल्या वेगवेगळ्या उत्कृष्ट locations या चित्रपटात दाखवले आहेत सोबत बऱ्याच स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी समाजाच्या दाहक वास्तवावर बोट ठेवलं आहे, पण इतर अनेक प्रसंग व पैलूंची जुळवाजुळव करण्यामध्ये एकंदरीत चित्रपटाला सामाजिक सध्यस्थिती बद्दल काय सांगायचे आहे हे मार्मिक पणे शेवटी स्पष्ट होतांना दिसत नाही.बापाची मुलासाठी धडपड , मुलाच्या

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

इमेज
आदरणीय प्राचार्य गणेश चौगुले सर नांदेड व मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठ नाव, आजघडीला सर लाखो आजी-माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत.                                     माझं खूप भाग्य समजतो की सरांनी आम्हाला अकरावीत असतांना स्वतः शिकवलं. अगदी हसत खेळत सर विध्यार्थ्यांशी connect व्हायचे. आज नांदेड NEET च्या तयारीसाठी पूर्ण महाराष्ट्राच केंद्रबिंदू झालंय. महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी येथे चौगुले कोचिंग क्लास मुळे येतात.                                जेंव्हा मी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला त्या वर्षी सरांचा क्लास मधला वावर कमी झाला, पण जेंव्हा सर क्लास मध्ये येणार अस कळायचं तेंव्हा अख्या क्लासला उत्सुकता असायची, सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असायचं, सरांच्या अभ्यासा संबंधित skills व strategies चा आजही उपयोग होतो. आज उच्च महाविद्यालयात शिकत असताना सरांची व क्लास ची नेहमी आठवण येत असते, क्लास मध्ये सर आल्या नंतर गाणं गाणं ,असं म्हणून ओरडणे हे आजही आठवत.                                  आजही आम्ही क्लास चे 11-12 वी चे किस्से सांगण्यात रंगून जतोत. क्लास म

शरद पवार: एक वादळी पर्व.

इमेज
27 व्या वर्षी आमदार, 31 व्या वर्षी मंत्री, 38 व्या वर्षी मुख्यमंत्री ( *महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री* ) 51 व्या वर्षी संरक्षण मंत्री. ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचे च नव्हे तर देशाचे राजकारण पुर्ण होत नाही, स्वाभिमान ,कार्यपद्धती, कर्तुत्व व सक्षम नेतृत्व हिच त्यांची ओळख आहे. शरद पवार या नावात अशी शक्ती आहे जी सर्वांना भारावून टाकते. अलीकडेच त्यांना भारत सरकारने देशाचा दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभुषण देऊन सन्मानित केले. संसदीय व विधीमंडळ कारकीर्दीची 50 वर्षे पुर्ण करणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार.शरद पवार हे अस एक नेतृत्व आहे जे अनेकांना पुर्णतः कळालेलच नाही. राजकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना पवार साहेबांवर बर्याचदा टीकाही झाल्या पण न डगमगता किंवा खचून न जाता त्यांनी नेहमी सकारात्मक राहून वाटचाल केली. शरद पवार साहेबांचा जनसंपर्क दांडगा आहे. आजही शरद पवार महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्याची किंवा जिल्ह्याची तेथील भौगोलिक, राजकीय क्षेत्राची माहिती इंत्यभुत देतात. अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात, हे त्यांच कसबच, एवढंच न