तरुणाई मध्ये वाढतेय राहुल यांची क्रेझ

#Conversation_with_changemakers राहुल गांधी यांची प्रतिमा विरोधी पक्ष व काही प्रमाणात Media ने खूप मालिन केली आहे,त्यांच्यावर खूप प्रमाणात टीका ही होत असते.राहुल गांधीच कधी भाषण ही ऐकलेल नसतं किंवा त्यांच्या विषयी वाचन ही नसतं असे लोक ज्यावेळेस fake videos पाहून राहुल यांना "पप्पू" म्हणून संबोधतात तेंव्हा खूप वाईट वाटत.एवढी टीका होऊन सुद्धा, आयुष्यात अनेक चढ उतार आले असतांना ही व्यक्ती खूप सकारात्मक राहते हे मला प्रचंड भावतं. आज जर सत्ताधाऱ्यांविषयी कुणी लिहिलं किंवा आवाज उठवला तर त्यांना नोटीस पाठवली जाते पण एवढी वैयक्तिक टीका होऊन सुद्धा लोकशाही ला धरून चालणारा हा युवकांचा नेता,माध्यमांसोबत, जनतेसोबत नेहमी संवाद साधत असतो. कितीही अपप्रचार केला तरीही शेवटी वास्तविकता ही जनतेसमोर येत असते. युवकांचा देश असणाऱ्या भारत देशात हा युवक नेहमी युवकांच्या प्रश्नांना तोंड देत असतो, गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मध्ये राहुल यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे.राहुल हजारो युवकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असतात याअगोदर चेन्नई, दिल्ली येथील त्यांचा युवासंवाद खूप गाजला,हे करत ...