हेच का भाजप चे महिला धोरण ?
त्याच बरोबर `बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा देत, महिला सशक्तीकरणा च्या संबंधित व महिलांच्या विकासाच्या साठी आमचं येणार सरकार कटिबद्ध असेल असं तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अनेक प्रचार सभेत ओरडून ओरडून सांगत होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा यांचं सरकार आलं तेंव्हा याच लोकांचे महिलांविषय चे विचार व धोरण काय होते व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजप कडे अनेक महान विद्वान वाचाळवीर आहेत यात शंकाच नाही.
एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या व भाजपा महिला विंग च्या कर्नाटक च्या नेत्या म्हणतात `प्रत्येक गोष्टीत महिला पुरूष समानता असण्याची गरज नाही'.
तर इकडे महाराष्ट्र्रात भाजपचे आमदार राम कदम म्हणतात, "मुली पळवून आणा बाकीच मी बघतो". अरे राम कदम मुली काय तुझ्या बापाची जहागीरदारी आहे का?. तर एम. जे. अकबर या भाजप च्या मंत्र्याने एका पत्रकार तरुणी चा छळ केला होता अस समोर आलं.
अन हेच राम कदम व एम जे अकबर आज “मै भी चौकिदार” म्हणून मिरवत आहेत. जर असे खुळचट मानसिकतेचे लोक चौकिदार असतील तर देशाचं भविष्य काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही.तर उनाओ बलात्कार प्रकरणात एका भाजपच्या आमदाराच नाव समोर आलं.
एकीकडे “बेटी पढाओ, बेटी बचाओ” चा नारा द्यायचा व न्याय हक्कांसाठी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये शेकडो विद्यार्थीनी आंदोलन करत असतांना बेदम लाठी चार्जे करून त्यांचा आवाज दाबायचा ही कुठली पद्धत, तर उत्तर प्रदेश मध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा ताफा जात असतांना विद्यार्थीनींनी काळे झेंडे दाखवत “अमित शहा चले जाव” अश्या घोषणा दिल्या. त्यावेळेस पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठी चार्जे करून त्यांचा आवाज दडपला.
भाजप संस्कृती, नैतिकता, मूल्य यांच्या गप्पा मारत, पण प्रत्यक्षात एवढया नीच स्तराला जाऊन भाजपा काम करते की, जेंव्हा मागच्या तीन-चार महिन्यांपूर्वी प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला, तेंव्हा अतिशय खालच्या पातळीवरच्या अश्लील टीका त्यांच्यावर करण्यात आल्या , एवढंच नाहीतर भाजपच्या IT cell ने प्रियांका च्या पंचवीशीतले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले फोटो व्हायरल करून अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरली, उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विषयी सुद्धा एका वाचाळवीराने अतिशय अश्लील शब्द वापरला जे मी इथे नमूद सुद्धा करू इच्छित नाही.
Thomson Reuters Foundation च्या 2018 च्या report नुसार , भारत देश हा महिलांना राहण्यासाठी जगातील सर्वात धोकादायक देश आहे, अस पुढे आलं आहे.“लैंगिक हिंसाचार , घरगुती अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
NCRB च्या report नुसार , महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे 83 % वाढले आहे असे स्पष्ट झाले आहे.
NCRB (NATIONAL CRIME RECORDS BUREAU) च्या रेपोर्ट नुसार बलात्काराचे नोंदवले गेलेले गुन्हे-
2013- 33,707
2014- 36,735
2015- 34,651
2016- 38,947
महिलांवरील प्राणघातक हल्ले-
2013 - 51,881
2014- 57,311
2015- 59,277
2016- 64,519
Global gender gap index हा 2016 मध्ये भारताचा क्रमांक 144 देशांपैकी 87 व्या स्थानावर होता तर 2017 मध्ये हा index 108 व्या स्थानावर गेलाय. हे होण्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे
महिलांचा अर्थव्यवस्थेतील कमी सहभाग होय.
Economy survey 2017-18 च्या नुसार 24% रोजगार फक्त महिलांना मिळू शकलाय. तर हेच प्रमाण 2005-06 मध्ये 36.3% होते.
भाजप सरकार ने मोठ्या गाजावाजात सुरू केलेल “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे अभियान सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल.
मंजूर केलेल्या निधी पैकी फक्त 10% निधी हा सरकार ने खर्च केला, तर त्यापैकी जवळपास 56% निधी हा सरकारने फक्त जाहिरातबाजीवर खर्च केला या पेक्षा आणखी दुर्दैवी बाब काय असू शकते?
भारत देशाला आज महिलांच्या बाबतीत सर्वात मोठा प्रश्न असेल तर तो म्हणजे “महिलांचे आरोग्य” होय.
2017 च्या GLOBAL NUTRITION REPORT नुसार,
कुपोषण हे भारतीय महिलांसाठी सर्वात भेडसावणारी समस्या आहे.
गर्भवती असणाऱ्या स्त्री मध्ये कुपोषणामुळे अनेमिया ( anemia)
होत आहे, तर जगाच्या तुलनेत भारत हा सर्वात जास्त महिला अनेमिया ग्रस्त असणारा देश आहे.
महिलांचे आरोग्य, सुरक्षा, रोजगार, न्यायहक्क, असे अनेक महिलांचे प्रश्न देशासमोर असतांना आज असतांना भाजपा आज वेगळ्याच वळणावर आहे, हे आपल्याला याठिकाणी प्रामुख्याने नमूद केलं पाहिजे. महिला सबलीकरणा च्या गप्पा फक्त निवडणूकांपुरत्या व 8 मार्च ( महिला दिन) पुरत्याच का ?
महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीवर च बोलून भारतीय संस्कृती प्रदूषित करण्याचं काम काही मंडळींकडून केलं जातं आहे, याचा आपण सुज्ञ नागरिकांनी विचार केला पाहिजे.
महिलांना हे करा, ते करू नका, इथे जाऊ नका हे सांगणारे आपण कोण? आज व्यक्तिस्वातंत्र्य आहे पुरुषांला जे हक्क आहेत तेच महिलांनासुद्धा आहेत.
आज स्त्री विरोधी कोणी बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या किंवा शासनाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. महिलांचा आदर हा सर्वस्तरांतून झालाच पाहिजे , महिलांच्या मनात सुरक्षिततेची व आदराची भावना निर्माण करण्याच काम सरकार ने व समाजाने केलं पाहिजे.पण जर काही भ्रष्ट बुद्धीचे लोक महिलांच्या विरोधात बोलत असतील तर , त्यांच्या मनात असुरक्षिततेचि भावना निर्माण करत असतील तर त्यांचा माज हा जनता उतरवल्या शिवाय राहणार नाही यात शंकाच नाही.
- vaibhav Darshanrao Desai
7028600378
References-
1)
Crimes Against Women Increased By 83% Over Last Ten Yearshttps://www.newsclick.in/crimes-against-women-increased-83-over-last-ten-years-says-ncrb
2)
https://www.thequint.com/news/india/beti-bachao-beti-padhao-less-than-20-percent-spent
3)
From Quartz India: Modi’s government claims it’s improved the lives of women. But here’s the reality https://qz.com/india/1333614/has-the-modi-government-improved-the-lives-of-indian-women/
4)
https://blog.ipleaders.in/why-is-women-participation-so-poor-in-indian-economy/
संपूर्ण लेख वाचा व आपले मत मांडा....
उत्तर द्याहटवा