लोकनेते विलासराव....

विलासरावजी देशमुख यांनी वयाच्या एकोणनतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४
मध्ये बाभळ गावचे सरपचं म्हणून राजकीय कारकीर्द सुरवात केली. युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबादबँकेचे संचालक, पंचायत समतीचा उपसभापती, जिल्हा परीषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडुन गेले.
उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पचं सूत्री कार्यक्रम राबिण्याचा प्रयत्न केला. तसेच लातुरकाँग्रेस चे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळल
नंतर विविध खात्यांचे मंत्री,राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री व केंद्रात ग्रामीण विकास व त्यानंतर पृथ्वीविज्ञान मंत्री असा विलासरावांचा प्रवास राहीला..
                               विलासराव हे महाराष्ट्रान च नव्हे तर भारताने पाहीलेलं ऐकलेल वादळ होतं
विलासरावांन बद्दल नेहमीच मला आकर्षण राहीलेल. पण दुर्दैवाने मला त्यांना ऐकता कींवा पाहता आला नाही.तस वर्तमानपत्रांतुन,वृत्तवाहीन्या यांच्या द्वारे साहेबांना जवळुन पाहता आल. विलासराव हे कतृत्त्वाने मोठे झालेले नेते तरीही त्यांनी आपली माती,माणसं विसरली नाही.
एक उत्तम प्रशासक म्हणून विलासरावांची पकड होती. अनेक प्रश्न सचोटीन ते हाताळत .
साहेबांच रुबाबदार पणा, गोरगरिबांना आधार देणं , वेगवेगळे प्रश्न मार्गी लावणं यातच त्यांच वेगळेपण होत. राजकारणापलीकडे पण मैत्री कशी जपावी याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब. महाराष्ट्राच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,सहकार,विज्ञान क्षेत्रातील जडणघडणीत विलासरावांचा मोठा वाटा आहे. विलासरावांनी लोकांच्या मनावर राज्य केल. त्यांच्या वक्तृत्व शैली ने तर सभास्थळी प्रचंड उत्साहाच वातावरण असायच.आजही विलासरावांची भाषण काहीतरी सांगुन जातात.या एवढ्या मोठ्या नेत्याच व्यक्तीमत्व व्यक्त करतांना मी निःशब्द होतो. लोकनेते, उत्तम प्रशासक ,उत्तम सांसदपट्टु, नेत्यांचा नेता स्व. विलासरावजी देशमुख साहेबांना विनम्र अभिवादन...
                                 - वैभव देसाई
#मनातले_विलासराव
#लोकनेते_विलासराव

 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

विकासपुरुष शंकरराव

शरद पवार: एक वादळी पर्व.