शरद पवार: एक वादळी पर्व.






27 व्या वर्षी आमदार, 31 व्या वर्षी मंत्री, 38 व्या वर्षी मुख्यमंत्री ( *महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री* )
51 व्या वर्षी संरक्षण मंत्री. ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचे च नव्हे तर देशाचे राजकारण पुर्ण होत नाही, स्वाभिमान ,कार्यपद्धती, कर्तुत्व व सक्षम नेतृत्व हिच त्यांची ओळख आहे. शरद पवार या नावात अशी शक्ती आहे जी सर्वांना भारावून टाकते. अलीकडेच त्यांना भारत सरकारने देशाचा दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभुषण देऊन सन्मानित केले. संसदीय व विधीमंडळ कारकीर्दीची 50 वर्षे पुर्ण करणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार.शरद पवार हे अस एक नेतृत्व आहे जे अनेकांना पुर्णतः कळालेलच नाही. राजकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना पवार साहेबांवर बर्याचदा टीकाही झाल्या पण न डगमगता किंवा खचून न जाता त्यांनी नेहमी सकारात्मक राहून वाटचाल केली.
शरद पवार साहेबांचा जनसंपर्क दांडगा आहे. आजही शरद पवार महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्याची किंवा जिल्ह्याची तेथील भौगोलिक, राजकीय क्षेत्राची माहिती इंत्यभुत देतात. अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात, हे त्यांच कसबच, एवढंच नाही तर त्यांना साहित्य ,क्रीडा कला, संगीत,विज्ञान,औद्योगिक या क्षेत्रांची सुद्धा जाण आहे. कृषी व सहकार क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की ज्या क्षेत्रात आपण आहोत किंवा ज्या विषया विषयी आपल्याला आस्था आहे,त्याच्याबद्दल संपर्क ठेवण्याची खबरदारी घेतली पाहिजे.
शरद पवार साहेबांच्या आवडी निवडी पैकी एक महत्वाची आवड म्हणजे विविध क्षेत्रातील व्यक्तींशी भेटणे व सुसंवाद साधने.
याच सवयी तून किंवा कौशल्यातून, आज सर्वच पक्षात त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर साहित्य, सांस्कृतिक, कला,विज्ञान, उद्योग, संगीत, क्रीडा,अभिनय क्षेत्रातील व्यक्तींशी सुद्धा त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. शरद पवारांनी शेतीचे प्रश्न, उद्योगाचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न , महिलांचे प्रश्न,सामाजिक प्रश्न, पाण्याचे प्रश्न ,सुरक्षिततेचे प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांच्या कालावधीत सचोटीने हाताळले व आजही सोडवतात .आज सत्तेत नसतानाही पवार साहेब वयाच्या 76 व्या वर्षी सुद्धा जनतेच्या अनेक समस्या सोडवतात. अलीकडच्या काळात साहेबांनी मराठवाड्याचा व विदर्भाचा दौरा केला ते तिथे अनेक शेतकऱ्यांना भेटले व शेतांची पाहणी केली. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या पवार साहेबांकडे मांडल्या , निवेदने दिली. म्हणजे लोक आजही शरद पवारांना राज्यकर्ता मानतात, व शरद पवार कोणत्याही समस्या सोडवू शकतात हे जनतेला माहिती आहे.शरद पवारांनी कारकीर्द वादळी ठरली आहे. गहू व तांदळाच्या उत्पादनातील भारताची यशस्वी झेप असेल ,किल्लारी भूकंपाच्या वेळी दाखवलेली तत्परता असेल ,किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विषय असेल की , महिलांना सैन्य दलात संधी देण्याचा विषय असेल. असे असंख्य निर्णय व कार्य शरद पवारांनी केले आहे. रयत शिक्षण संस्था असेल की विद्या प्रतिष्ठान यांच्या सारख्या शैक्षणिक संस्था च्या माध्यमातून साहेब शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावतात. क्रीडा क्षेत्रातील पवार साहेबांची कामगिरी उल्लेखनीय आहे.2005 साली साहेब BCCI चे अध्यक्ष म्हणून निवडून आले . त्यानंतर 2010 मध्ये ते ICC चे अध्यक्ष झाले तसेच त्यांनी MCA च अध्यक्षपद सुद्धा सांभाळलं. पवार साहेबांच्या आयुष्यात अनेक चढ - उतार आले .त्यात जीवघेणा कॅन्सर सारखा आजार असो की, पंतप्रधान पदाने दिलेली हुलकावणी, किंवा नवीन पक्ष स्थापन करण्याची वेळ असो.1999 साली पवारांनी पक्ष स्थापन केला व नव्या पर्वाची सुरवात केली . हा पक्ष कमी कालावधीतच बघता बघता वाढत गेला व राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपास आला ,आजघडीला भारतात फक्त 6 राष्ट्रीय पक्ष आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे .ही आभिमानाची बाब आहे. शरद पवारांनी समाजातील वंचित,मागास,दुबळ्या ,बेरोजगार वर्गास वर आणण्याचा प्रयत्न केला. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात महत्वाचे स्थान दिले व त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. विरोधकही शरद पवारांचं कार्य व मोठेपण मान्य करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात जाहीर पणे पवारांवर स्तुतीसुमने उधळली . बारामती ला आले असते त्यांनी आवर्जून सांगितले की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणाचे धडे घेतले. दिल्ली येथील पवारांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी पवारांची देशाबद्दलची दूरदृष्टी कश्यापद्धतीची आहे हे सांगितले व त्यांच्या कार्याचा गौरव केला. याच कार्यक्रमात
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात पवार यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा विशेष उल्लेख केला. मुंबई स्फोटांनंतर मुंबईला तत्काळ पूर्वपदावर  आणण्याचे आव्हान त्यांनी कसे प्रभावीपणे पार पाडले, याचा संदर्भ देताना त्यांनी त्या वेळी आलेल्या एका वृत्तपत्रीय मथळ्याने, ‘सलाम बाँबे, सलाम पवार’ने आपल्या भाषणाचा समारोप करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अस्याच पद्धतीने त्यांच्या कार्याचा उल्लेख अनेक जण करत असतात .पवारांच्या 50 वर्षाच्या संसदीय व विधिमंडळ कारकिर्दीच्या निमित्ताने पवारांचे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वपक्षीय सत्कार सोहळे झाले. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी केलेले कार्य व कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील. साहेबांविषयी बरच काही लिहिता येईल . मी लिहिलेल्या पैकी सर्वच गोष्टी अनेकांना माहितीही असतील पण हा थोडासा प्रयत्न .
मुत्सद्दी राजकारणी, कृषिरत्न, सामान्यांचा कैवारी , अजातशत्रू, अनेकांचे प्रेरणास्थान ,लोकनेते ,आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
- वैभव देसाई.
📱7028600378
📩vaibhavdesai7077@gmail.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

विकासपुरुष शंकरराव