प्रेम-करीअर-मेहनत-जिद्द व सामाजिक सध्यस्थिती वर भाष्य करणारा 'पाटील'

सहयाद्री मंथन | पुणे
◆ वैभव देसाई 
________________________________________

सामाजिक सध्यस्थिती व फोपावलेला जातीवाद यावर दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी आपल्या पहिल्यावाहिल्या चित्रपटा मध्ये प्रकाश टाकला आहे...त्याचबरोबर प्रेम- करिअर-जिद्द व मेहनत यावर भाष्य केले आहे.


पाटील चित्रपटाचे पोस्टर

आजपर्यंत पाटील या घटकाची भूूमिका लिखाणातून, चित्रपटातून बहुतांश वेळा नकारात्मक रेखाटली आहे किंवा तस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पण पटकथा लेखक व दिग्दर्शक संतोष मिजगर यांनी एक भावनिक,मेहनती, कष्टाळू, इमानदार पाटला च वास्तव दाखवलं आहे. आजघडीला पाटलांची सध्यस्थिती काय आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.. मिजगर यांनी नांदेड शहर व परिसरात असलेल्या वेगवेगळ्या उत्कृष्ट locations या चित्रपटात दाखवले आहेत सोबत बऱ्याच स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे.
त्याचबरोबर त्यांनी समाजाच्या दाहक वास्तवावर बोट ठेवलं आहे, पण इतर अनेक प्रसंग व पैलूंची जुळवाजुळव करण्यामध्ये एकंदरीत चित्रपटाला सामाजिक सध्यस्थिती बद्दल काय सांगायचे आहे हे मार्मिक पणे शेवटी स्पष्ट होतांना दिसत नाही.बापाची मुलासाठी धडपड , मुलाच्या प्रेमप्रकरणामुळे वडिलांची झालेली नाहक बदनामी तसेच मुलाचं झालेलं शैक्षणिक नुकसान सोबत च या प्रसंगांना जडलेली समाजीकतेची किनार ( जातीयवाद) व वडिलांचे हाल पाहवत नसल्याने जिद्दीने उठून मेहनत करण्याची मुलाची तयारी व त्यातून त्याला मिळालेले यश या सर्वांची जुळवाजुळव आपल्याला या चित्रपटामधून दिसून येते.
                            चित्रपटाचा नायक हा संतोष मिजगर ( शिवाजी पाटील) व नरेंद्र देशमुख ( कृष्णा पाटील ) यांनी साकारला आहे.नरेंद्र देशमुख चा हा पहिलाच चित्रपट आहे, पण नरेंद्र ने नैसर्गिक अभिनय करण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आहे. नरेंद्र हा इंजिनिअर आहे पण त्याचा भाऊ विनय मुळे तो या क्षेत्राकडे आला. या चित्रपटात नायिका म्हणून भाग्यश्री मोटे ने पुष्पाची भूमिका साकारली आहे, भाग्यश्री या क्षेत्रात अनुभवी आहे त्यामुळे ती नरेंद्र पेक्षा अभिनयात नक्कीच सरस ठरते. भाग्यश्री ने तिच्या पत्राला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.जेष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी (अक्का) ची भूमिका बजावली आहे,त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाला भावनेची किनार आहे..त्यामुळे त्यांचा अभिनय आणखीनच उजवा ठरतो. शेवटी प्रतिमा देशपांडे हिने सुद्धा उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली आहे, सोबतच शिवाजी लोटन पाटील, सुरेश पिल्लई, योगेश गुडसुरकर,पूजा सरजीने यांनी सुद्धा त्यांच्या पात्रांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
------------------------------------------------------------------------------------
अभिनेत्री प्रतिमा देशपांडे

अभिनेत्री वर्षा दांदळे

● पटकथा ●

चित्रपटाची कथा ही शिवाजी पाटील व कृष्णा पाटील या पात्रांभोवती फिरते
जिल्हाधिकारी कार्यालयात क्लर्क पदावर रुजू असलेल्या शिवाजी पाटीलचा भुतकाळ, त्याचा संघर्षाचा काळ, त्यानी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द सिनेमात सुरुवातीला दाखवली आहे. आयुष्यात आपल्याला जे करता आले नाही; म्हणजेच आपल्याला मोठा सरकारी 'साहेब' होता आले नाही. हे शिवाजीचे स्वप्न, तो मुलगाकडून पूर्ण करेल, त्याला मोठा साहेब बनवेल अशी त्याची आशा आहे. मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रेवेश मिळावा यासाठी शिवाजी आपला वडिलोपार्जित वाडा गहाण ठेवून पैसे उभारतो. यावेळी शिवाजीचा मित्र भिमा वाघमारे (सुरेश पिल्ले), जो उपजिल्हाधिकारी आहे. तो शिवाजीच्या मुलाला अर्थात कृष्णाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशासाठी मदत करतो. भिमाची मुलगी पुष्पा (भाग्यश्री मोटे) देखील त्याच कॉलेजमध्ये शिकत असते. शिवाजी आणि भिमा हे बालमित्र असल्यामुळे तसेच शिवाजीच्या वडिलांच्या मदतीमुळेच भिमाचे उच्चशिक्षण पूर्ण होऊन तो अधिकारी पदापर्यंत पोहोचला असतो. त्यामुळेच त्या दोघांच्या (शिवाजी आणि भिमा) घरचे संबंध चांगले असतात.
नंतर चे कृष्णाचे प्रेमसंबंध , अर्धवट सोडलेलं शिक्षण, खचून गेलेला शिवाजी पाटील? सोबतच समाजीकतेची ( जातीवाद) किनार ...
समोर कृष्णा कशा पद्धतीने जिद्दीने उठतो? तो आपल्या प्रेमाला विसरतो का? पाटील कुटुंबियांना मान मिळवून देतो का? आगामी जिवनात तो यशस्वी होतो का? आदी सर्व उत्तर जाणून घ्यायची असतील. तर, एकदा सिनेमा पाहायला हरकत नाही. पण, ज्या वडिलांनी आपला वडिलोपार्जित वाडा गहाण ठेवून मुलाच्या इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रवेशासाठी लाखो रुपये उभे केले. तो मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडतो आणि मोठा साहेब होण्यासाठी मुंबई गाठतो, हे पचवणे थोडे कठीण जाते, सिनेमात संतोष मिजगर, भाग्यश्री मोटे, प्रतिमा देशपांडे आणि वर्षा दांदळे यांची काम छान झाली आहेत.


तुला पाहून
राधेला पाहूनी

सूर्य थांबला

चित्रपटातील गाणे: 1) तुला पाहून मिळते मला जी खुशी
                              2) राधेला पाहुनी
                              3) सूर्य थांबला


                                   Movie Trailer


             छत्रपती उदयनराजे भोसले व पाटील चित्रपटाची टीम

पाटील चित्रपटास उदयनराजे भोसले व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच विशेष सहकार्य लाभल आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
निर्मिती संस्था :बॉलिवुड टुरिझम प्रस्तुत,स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि.
सचिकेत प्रोडकशन्स, शौभम सिनेव्हिजन प्रा.लि. निर्मित

कथा,पटकथा आणि दिग्दर्शन : संतोष मिजगर
कलाकार : संतोष मिजगर, नरेंद्र देशमुख, सुरेश पिल्ले, भाग्यश्री मोटे, कपिल गुडसूरकर, प्रतिमा देशपांडे, पूजा सरंजीने, अभिलाषा पाटील, वर्षा दांदळे


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


★ SAHYADRI RATINGS - 3.5/5




#Patil #PatilMovie #26October #MarathiMovie #Movie #Director #Team #poster

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

विकासपुरुष शंकरराव

शरद पवार: एक वादळी पर्व.