पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शरद पवार: एक वादळी पर्व.

इमेज
27 व्या वर्षी आमदार, 31 व्या वर्षी मंत्री, 38 व्या वर्षी मुख्यमंत्री ( *महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री* ) 51 व्या वर्षी संरक्षण मंत्री. ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचे च नव्हे तर देशाचे राजकारण पुर्ण होत नाही, स्वाभिमान ,कार्यपद्धती, कर्तुत्व व सक्षम नेतृत्व हिच त्यांची ओळख आहे. शरद पवार या नावात अशी शक्ती आहे जी सर्वांना भारावून टाकते. अलीकडेच त्यांना भारत सरकारने देशाचा दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभुषण देऊन सन्मानित केले. संसदीय व विधीमंडळ कारकीर्दीची 50 वर्षे पुर्ण करणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार.शरद पवार हे अस एक नेतृत्व आहे जे अनेकांना पुर्णतः कळालेलच नाही. राजकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना पवार साहेबांवर बर्याचदा टीकाही झाल्या पण न डगमगता किंवा खचून न जाता त्यांनी नेहमी सकारात्मक राहून वाटचाल केली. शरद पवार साहेबांचा जनसंपर्क दांडगा आहे. आजही शरद पवार महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्याची किंवा जिल्ह्याची तेथील भौगोलिक, राजकीय क्षेत्राची माहिती इंत्यभुत देतात. अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात, हे त्यांच कसबच, एवढंच न