पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विकासपुरुष शंकरराव

इमेज
महाराष्ट्राच्या व देशाच्या सामाजिक, राजकिय व विकासासंदर्भात ज्यांनी दूरदृष्टी ठेऊन कार्य केलं असे थोडे फारच मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यापैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब. पैठणच्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या शंकररावांचा नांदेडचे नगराध्यक्ष ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास राहिला . घरची हलाकीची परिस्थिती असतानासुद्धा शंकररावांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग नोंदवत युवकांना एकत्रित करण्याकरिता महत्वाची भूमिका निभावली. शंकरराव पुढे उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले,शंकरराव हे हुशार व होतकरू विद्यार्थी होते त्यामुळे त्यांना तेथील महाविद्यालयात scholarship मिळाली व त्या माध्यमातून त्यांनी BA व वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान 1934 साली त्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला, स्वामींच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेबांनी मोठया ताकदीने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला.                            शंकररावांच कर्तृत्व पाहून स्वामी रामानंद तीर्थ यांनी