पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणाई मध्ये वाढतेय राहुल यांची क्रेझ

इमेज
#Conversation_with_changemakers राहुल गांधी यांची प्रतिमा विरोधी पक्ष व काही प्रमाणात Media ने खूप मालिन केली आहे,त्यांच्यावर खूप प्रमाणात टीका ही होत असते.राहुल गांधीच कधी भाषण ही ऐकलेल नसतं किंवा त्यांच्या विषयी वाचन ही नसतं असे लोक ज्यावेळेस fake videos पाहून राहुल यांना "पप्पू" म्हणून संबोधतात तेंव्हा खूप वाईट वाटत.एवढी टीका होऊन सुद्धा, आयुष्यात अनेक चढ उतार आले असतांना ही व्यक्ती खूप सकारात्मक राहते हे मला प्रचंड भावतं. आज जर सत्ताधाऱ्यांविषयी कुणी लिहिलं किंवा आवाज उठवला तर त्यांना नोटीस पाठवली जाते पण एवढी वैयक्तिक टीका होऊन सुद्धा लोकशाही ला धरून चालणारा हा युवकांचा नेता,माध्यमांसोबत, जनतेसोबत नेहमी संवाद साधत असतो. कितीही अपप्रचार केला तरीही शेवटी वास्तविकता ही जनतेसमोर येत असते. युवकांचा देश असणाऱ्या भारत देशात हा युवक नेहमी युवकांच्या प्रश्नांना तोंड देत असतो, गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मध्ये राहुल यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे.राहुल हजारो युवकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असतात याअगोदर चेन्नई, दिल्ली येथील त्यांचा युवासंवाद खूप गाजला,हे करत

"कनेक्शन टू ऑब्सेशन: भारतातील वाढते इंटरनेट व्यसन"

इमेज
Image credit :  Digital addiction - HelloGrads गेल्या दहा वर्षात digital क्रांती मध्ये झपाट्याने प्रगती झाली ती इतकी की, अन्न,वस्त्र,निवारा या मुलभुत गरजांनंतर नकळत का होईना आपण digital विश्वासाचा समावेश करतो मग यात भ्रमणध्वनी असेल,आंतरजाल असेल वा इतर त्या संबधित साधने म्हणजे यांची आपल्या आजघडीला क्षणाक्षणाला गरज भासते.                            ब्रिटन (England) मध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती संपूर्ण जगभरात पसरली . औद्योगिक क्रांती ची सुरुवात ही वस्त्रोद्योगाचे यंत्र बनवणे,लोखंड बनवण्याचे कौशल्य ते  electronic वस्तू बनवणे असा अनेक दशकांचा प्रवास सुरु झाला .याच पार्श्वभूमीवर 19 व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात इंग्रजी गणित प्राध्यापक चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या संरचनेच्या आधारित इ.स.1937-46 च्या दरम्यान च्या काळात डिजिटल युगात खूप मोठी क्रांती आणणाऱ्या संगणकाची निर्मिती झाली. पण त्या काळातील संगणकाना खूप काही मर्यादा होत्या तसेच त्यांचा आकार खूप मोठा होता पण नंतरच्या काळात त्यात खूप बदप होत गेले व संगणका मध्ये परिवर्तन होऊन आज त्याचे स्वरूप तर आपल्या समोर आहेच.            

हेच का भाजप चे महिला धोरण ?

इमेज
सत्तेत येण्यापूर्वी भाजप ने अनेक आश्वासने जनतेसमोर दिली ,'अच्छे दिन' चा नारा देत 2014 (मे) मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. ज्या अच्छे दिन ची भुरळ घालून मोदी सरकार सत्तेत आलं,  ते अच्छे दिन अस काही नसतंच  असं भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. म्हणजे ज्यामूळ यांना जनतेनी निवडून दिल तेच यांनी `जुमला'म्हणून बाजूला सारल. त्याच बरोबर ` बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा देत, महिला सशक्तीकरणा च्या संबंधित व महिलांच्या विकासाच्या साठी आमचं येणार सरकार कटिबद्ध असेल असं तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अनेक प्रचार सभेत ओरडून ओरडून सांगत होते. पण प्रत्यक्षात जेंव्हा यांचं सरकार आलं तेंव्हा याच लोकांचे महिलांविषय चे विचार व धोरण काय होते व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजप कडे अनेक महान विद्वान वाचाळवीर आहेत यात शंकाच नाही. एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या व भाजपा महिला विंग च्या कर्नाटक च्या नेत्या म्हणतात `प्रत्येक गोष्टीत महिला पुरूष समानता असण्याची गरज नाही'. तर इकडे मह