विकासपुरुष शंकरराव



महाराष्ट्राच्या व देशाच्या सामाजिक, राजकिय व विकासासंदर्भात ज्यांनी दूरदृष्टी ठेऊन कार्य केलं असे थोडे फारच मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यापैकी एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब.
पैठणच्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या शंकररावांचा नांदेडचे नगराध्यक्ष ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास राहिला.
घरची हलाकीची परिस्थिती असतानासुद्धा शंकररावांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग नोंदवत युवकांना एकत्रित करण्याकरिता महत्वाची भूमिका निभावली. शंकरराव पुढे उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले,शंकरराव हे हुशार व होतकरू विद्यार्थी होते त्यामुळे त्यांना तेथील महाविद्यालयात scholarship मिळाली व त्या माध्यमातून त्यांनी BA व वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान 1934 साली त्यांना स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला, स्वामींच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण साहेबांनी मोठया ताकदीने मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला.
                           शंकररावांच कर्तृत्व पाहून स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुढे त्यांना Hyderabad state congress च्या नांदेड विभागाच्या सचिव म्हणून जबाबदारी दिली. याच काळात शंकररावांची सामाजिक व राजकीय कार्यांच्या माध्यमातून नांदेडशी नाळ निर्माण झाली. सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असतांना पुढे त्यांनी 1952 साली नांदेड नगरपालिकेची निवडणूक लढवली व ते नांदेडचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नांदेडचे नगराध्यक्ष म्हणून शंकररावांनी नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. पुढे त्यांनी 1957 साली मुंबई state च्या विधिमंडळाची निवडणूक लढवली.
                  संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समावेश झाला. शंकररावांकडे पाटबंधारे व ऊर्जा खात्याची जबाबदारी देण्यात आली.पुढे बराच काळ चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री राहिले, पाटबंधारे व ऊर्जा विभागाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात मोठेमोठे प्रकल्प उभारले, ज्यांचा फायदा आजही महाराष्ट्राच्या जनतेला होतो.


       पुढे शंकरराव चव्हाण साहेबांना 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977 व 14 मार्च 19 86 ते 24 जून 1988 या कालावधीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.शंकररावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत झालेले निर्णय आजही महत्वपूर्ण ठरत आहेत. शंकरराव चव्हाण यांनी अल्पावधीतच आपल्या कणखरपणा चा प्रत्यय आणून देण्यास सुरुवात केली. विधानसभेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष दुधाने यांच्या भ्रष्टाचाराबद्दल जोरदार टीका झाली .तेंव्हा शंकररावांनी विधानसभेतच दुधाने यांच्या निलंबनाची घोषणा केली. अधिकाऱ्यांची गैरवर्तनाबद्दल गय केली जाणार नाही, असा संदेश त्यामुळे सबंध राज्यभर गेला.चव्हाण साहेबांनी प्रशासनात कठोर शिस्त आणली.


           शंकररावांचा विविध विषयांवरील अभ्यास प्रचंड होता त्यामुळे अधिकारी सुध्दा त्यांच्या समोर पूर्वतयारी करूनच येत असत.त्यांच्या कठोर शिस्तीमुळे व वेळेच्या महत्वामुळे मंत्रीसुद्धा जनतेसाठी नेहमी उपलब्ध असण्यासाठी ची खबरदारी घेत असत.तेंव्हा पासून शंकरराव चव्हाणांना हेडमास्तर असे संबोधले जाऊ लागले.मंत्रालयातील कामे सुकर व्हावीत या करिता शंकररावांनी सामान्य  नागरिकांना मंत्रालयात दुपारी दोन नंतर प्रवेश देण्याची पद्धत अमलात आणली.त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकहिताचे निर्णय झाले.याच दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या पण शंकररावांनी सकारात्मक राहून पुढील यशस्वी वाटचाल केली.पुढे शंकरराव देशाच्या राजकारणा गेले व देशाचे शिक्षण,अर्थ,संरक्षण,गृह अशी महत्वाची खाती त्यांनी यशस्वीरित्या निभावली. राज्याचे उपमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय मंत्री या सर्व कार्यकाळात त्यांनी अनेक प्रश्न सचोटीने हाताळले. अनेक लोकहिताचे निर्णय हे त्यांच्या कालावधीत झाले.
                            शंकरावांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला नवसंजीवनी देणाऱ्या 34 धरणांची उभारणी झाली व 64 धरणांच्या उभारणी मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे.50 वर्षांची राजकिय कारकीर्द पूर्ण केलेले शंकरराव मात्र नेहमी नम्र, प्रामाणिक, मितभाषी, साधे, चारित्र्यसंपन्न राहिले. त्यांच्या एवढ्या मोठ्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत त्यांनी कधीच प्रसिद्धीच्या हवं केली नाही. नेहमी ते तत्वानेच वागले. त्यांचा साधेपना नेहमीच सर्वांना भावायचा. नांदेड चे नगराध्यक्ष असतांना ते सायकल वर कार्यालयाला जात असत. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर शंकररावांना मुंबई मध्ये राहायला घर नव्हते. तेंव्हा ते आमदार निवसातील दोन खोल्यांमध्ये आपल्या परिवार सोबत राहायला गेले.
                        सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असतांना चव्हाण साहेबांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. सर्वसमावेशकता हे त्यांच्या कार्यपद्धती चे वैशिष्ट्य राहिलेले आहे.शंकररावांच्या राजकीय जीवनात काही अपमानाचे व अपयशाचे प्रसंग आले पण साहेबांनी खचून न जाता सबुरीने सकारात्मक राहून वाटचाल केली. शंकरावांच्या दूरदृष्टी चे आज अनेक जिवंत उदाहरणे आहेत.


                      प्रचंड विरोध होत असून सुद्धा उभं केलेलं जायकवाडी च धरण असो की कुकडीचा औष्णिक वीज प्रकल्प असे अनेक लोकोपयोगी निर्णय शंकररावांनी घेतले. उजनी, जायकवाडी, अप्पर वर्धा,काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी, एलदरी असे विविध मोठे प्रकल्प आजघडीला महाराष्ट्राच्या बहुतांश भागासाठी वरदान ठरत आहेत. कोराडी,पारस, एलदरी, चंद्रपूर हे महत्वाचे वीज प्रकल्प चव्हाण साहेब पाटबंधारे व ऊर्जा मंत्री असतांना मार्गी लागले.
                     अशा या दूरदृष्टी नेत्याचं हे जन्मशताब्दी च वर्ष. मुत्सद्दी राजकारणी, लोकनेते, विकास पुरुष कै.डॉ.शंकरराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन.

- वैभव देसाई
Vaibhavdesai7077@gmail.com
contact No: 7028600378


संदर्भ सूची
1. महाराष्ट्राची सुवर्णगाथा ; वसंत देशपांडे
2. स्मरणयात्रा facebook page
3.wikipedia
4.shankarrao chavan memorial, Nanded

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

"कनेक्शन टू ऑब्सेशन: भारतातील वाढते इंटरनेट व्यसन"