समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

आदरणीय प्राचार्य गणेश चौगुले सर नांदेड व मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठ नाव, आजघडीला सर लाखो आजी-माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत.


                                    माझं खूप भाग्य समजतो की सरांनी आम्हाला अकरावीत असतांना स्वतः शिकवलं. अगदी हसत खेळत सर विध्यार्थ्यांशी connect व्हायचे. आज नांदेड NEET च्या तयारीसाठी पूर्ण महाराष्ट्राच केंद्रबिंदू झालंय. महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी येथे चौगुले कोचिंग क्लास मुळे येतात.
                               जेंव्हा मी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला त्या वर्षी सरांचा क्लास मधला वावर कमी झाला, पण जेंव्हा सर क्लास मध्ये येणार अस कळायचं तेंव्हा अख्या क्लासला उत्सुकता असायची, सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असायचं, सरांच्या अभ्यासा संबंधित skills व strategies चा आजही उपयोग होतो.
आज उच्च महाविद्यालयात शिकत असताना सरांची व क्लास ची नेहमी आठवण येत असते, क्लास मध्ये सर आल्या नंतर गाणं गाणं ,असं म्हणून ओरडणे हे आजही आठवत.
                                 आजही आम्ही क्लास चे 11-12 वी चे किस्से सांगण्यात रंगून जतोत. क्लास मध्ये आम्ही शिकलोच पण सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वा मुळे अनेक आठवणी निर्माण झाल्या. सरांनी शिकवणुकी बरोबरच अनेक छंद जोपासली, सरांच वाचणं अफाट आहे, त्याच प्रमाणे सर एक उत्तम गायक पण आहेत. त्याचा उत्तम नमुना म्हणजे सरांनी रचना केलेलं "व्हाय दिस गोदावरी गोदावरी नदी" हे गाणं होय (https://youtu.be/vjMbt6_ehhs)


                              Biology साठी क्लास म्हंटल की सर्वांच्या तोंडातून प्रामुख्याने एकच नाव येत ते म्हणजे "चौगुले". मागच्या 20 वर्षांच्या कारकीर्दत सरांच्या मार्गदर्शना खाली अनेक विध्यार्थी आज वैद्यकीय क्षेत्रात आपला नावलौकिक कमावत आहेत. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक जणांना सरांचं मार्गदर्शन महत्त्वाच ठरतं. 2015-16 च्या दरम्यान CET मध्ये एका प्रश्नाच उत्तर चुकीचं होतं त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच नुकसान होणार होत, पण सरांनी संपूर्ण महाराष्ट्रात पालक, शिक्षक यांना सोबत घेऊन लढा उभारला व त्यांच्या मागणीला यश आलं, त्याचप्रमाणे सरांचे नीट परीक्षेचे प्रयत्न असो किंवा नांदेड ला neet center आणण्यासाठी चे प्रयत्न खूप मोलाचे आहेत.
                              सर एवढ्या वरच थांबले नाहीत तर ते सामाजिक कार्यात सुद्धा मोलाची कामगिरी बजावतात. आजघडीला Ideal institute of Biology ( पूर्वीचे चौगुले biology कोचिंग क्लासेस) च्या माध्यमातून सरांनी अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले, आजही iib दमदार कामगिरी बजावत आहे.
                              हे सर्व इथे सांगण्याचा उद्देश म्हणजे आदरणीय गणेश चौगुले सर निवृत्ती घेत आहेत. सरांनी आज IIB च्या सर्व जबाबदाऱ्या सोडल्या पण IIB ने सरांच्या सन्माना प्रति दिलेलं मानधन सुद्धा नाकारलं उलट सामाजिक जाण ठेऊन त्या ऐवजी दरवर्षी 2000 हुशार व होतकरू विध्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्यास सांगितले.
       सर तुमच्या प्रति असलेला आमच्या मनातील आदर कायम आहे.
तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आपणास ऐश्वर्य,यश, आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
      आपल्या कार्यकर्तृत्वास आम्हा सर्वांचा मनाचा सलाम 😢😢

                             - वैभव दर्शनराव देसाई
                                📲 7028600378
                                📩 Vaibhavdesai7077@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विकासपुरुष शंकरराव

"कनेक्शन टू ऑब्सेशन: भारतातील वाढते इंटरनेट व्यसन"