तरुणाई मध्ये वाढतेय राहुल यांची क्रेझ
#Conversation_with_changemakers
राहुल गांधी यांची प्रतिमा विरोधी पक्ष व काही प्रमाणात Media ने खूप मालिन केली आहे,त्यांच्यावर खूप प्रमाणात टीका ही होत असते.राहुल गांधीच कधी भाषण ही ऐकलेल नसतं किंवा त्यांच्या विषयी वाचन ही नसतं असे लोक ज्यावेळेस fake videos पाहून राहुल यांना "पप्पू" म्हणून संबोधतात तेंव्हा खूप वाईट वाटत.एवढी टीका होऊन सुद्धा, आयुष्यात अनेक चढ उतार आले असतांना ही व्यक्ती खूप सकारात्मक राहते हे मला प्रचंड भावतं. आज जर सत्ताधाऱ्यांविषयी कुणी लिहिलं किंवा आवाज उठवला तर त्यांना नोटीस पाठवली जाते पण एवढी वैयक्तिक टीका होऊन सुद्धा लोकशाही ला धरून चालणारा हा युवकांचा नेता,माध्यमांसोबत, जनतेसोबत नेहमी संवाद साधत असतो. कितीही अपप्रचार केला तरीही शेवटी वास्तविकता ही जनतेसमोर येत असते. युवकांचा देश असणाऱ्या भारत देशात हा युवक नेहमी युवकांच्या प्रश्नांना तोंड देत असतो, गेल्या काही वर्षांपासून तरुणाई मध्ये राहुल यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे.राहुल हजारो युवकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असतात याअगोदर चेन्नई, दिल्ली येथील त्यांचा युवासंवाद खूप गाजला,हे करत असतांना खूप हिम्मत लागते कारण पुढच्या तरुणांच्या खूप अपेक्षा असतात, त्यानुसार त्यांना उत्तरे द्यावी लागतात.राहुल नेमकी, अपेक्षित व मुद्देसूद उत्तरे विध्यार्थ्यांना व युवकांना देत असतात त्यात जास्त फाफट पसारा नसतो त्यामुळे त्यांची ही पद्धत अनेक युवकांना आज आकर्षित करत आहे. आज युवकांना भावनिकतेच राजकारण नकोय रोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास,गतिशील प्रशासन व विकासाचा दृष्टीकोन हवाय त्यामुळे आज अनेक युवकांपुढे राहुल हे यासाठी सक्षम पर्याय म्हणून पाहिले जातात. एकीकडे लोकांमध्ये मिसळणारा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा हा नेता व दुसरीकडे बंद दाराआड ‛मन की बात’ करणारे प्रधानमंत्री. आज पुण्यामध्ये सुद्धा राहुल यांनी विद्यार्थी व युवकांसोबत अतिशय उत्कृष्ट संवाद साधला, अनेक युवकांना आज एक visionary leader राहुल गांधी कळले. आगामी काळात या visionary,focused, inclusive, honest अश्या नेतृत्वाला आपण संधी दिली तर नक्कीच आपल्याला एक सकारात्मक बदल देशात नक्कीच दिसल्याशिवाय राहणार नाही
#rahulgandhi
#youthicon
#changemakers
-VAIBHAV DARSHANRAO DESAI
Email- vaibhavdesai7077@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा