10 वी नंतर विज्ञान क्षेत्रातील करीअर

* 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी.. विज्ञान शाखेतील संधी 


*subjects in science 
1)physics 
2) chemistry 
3)biology 
4)mathematics 

हे चार महत्वाचे विषय..करियर ची यातुनच सुरवात होते.
यात प्रामुख्याने तिन भाग पडतात.

* Bio GROUP 

*GENRAL GROUP 

*MATH GROUP. 

 Bio group असणार्या विद्यार्थ्यांना medical क्षेत्रात करीअर करण्याची संधी मिळते. 
तर  math group असणार्या विद्यार्थ्यांना engineering मध्ये करीअर करण्याची संधी मिळते. 
व genral group असणार्या विद्यार्थ्यांना दोन्ही पण संधी उपलब्ध होतात. 

सर्वप्रथम आपण या क्षेत्रातील परीक्षांची माहिती घेऊया

#Bio group 

1)NEET 
2)MH-CET
3)AIIMS 
4)JIMPER 
5)AFMCP

MATHEMATICS GROUP 

1)MH-CET math
2)JEE
3)BITSAT
4)VITEEE

तर  GENRAL GROUP विद्यार्थ्यांना वरील सर्व परीक्षा देता येतात..

वरील परीक्षांपैकी MH CET सोडून सर्व परीक्षा या NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. 


*तर या परीक्षांची तयारी कशी करावी?
:अकरावी-बारावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो .
: त्यामुळे आपण याकाळात अधिक मेहनत घेण गरजेचे आहे
समोर अनेक पर्याय आहेत पण पहिल्याच प्रयत्नात किंवा पहिल्या टप्प्यातून यशाकडे जाण श्रेयस्कर ठरतं.
:या सर्व परीक्षांसाठी ncert (11th-12th) तयारी करण सर्वात महत्वाचे.

परीक्षांचा अभ्यास कशाप्रकारे करावा?

* या परीक्षांची वेगळी अशी तयारी करण गरजेचे नाही. 
*या परीक्षेसाठी self-study  सर्वात महत्वाची आहे.
* अभ्यास हा नियोजनपुर्ण व सातत्यपूर्ण असावा.
NCERT 11वी व 12 वी च्या पुस्तकांचा काटेकोर पणे अभ्यास करावा.
* PHYSICS , MATHEMATICS,CHEMISTRY  हे विषय conceptual आहेत. त्यामुळे या विषयांचा सराव करण अत्यंत गरजेचे आहे.
*medical विद्यार्थांसाठी BIOLOGY हा scoring subject आहे.  त्यामुळे या विषयाचा नियोजनपूर्वक अभ्यास करावा.
*वेळापत्रक तयार करून नियोजनबद्ध अभ्यास करावा.


@या परीक्षांसाठी क्लासेस लावावेच लागतात का?

* अस काही नाही की, क्लासेसच लावावेत घरीपण चांगला अभ्यास करता येतो.
* तुम्ही तुमच्या काॅलेज मध्ये शिकवलेल्या शिकवणी वर अभ्यास करु शकता.
*जर काही अडचण आली तर शिक्षकांना विचारुन solve करुन घ्यावी
*ज्यांना क्लास लावण शक्य असतील त्यांनी लावावेत पण,स्वअध्ययन अत्यंत महत्वाचे आहे.
*जितका जास्त तुम्ही सराव कराल तितकं जास्त तुम्हाला समजेल.

:PRACTICE MAKES MAN PERFECT:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समर्पित व्यक्तिमत्त्व गणेश चौगुले सर

विकासपुरुष शंकरराव

"कनेक्शन टू ऑब्सेशन: भारतातील वाढते इंटरनेट व्यसन"